मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात विवेक रमन नावाच्या व्यक्तीने गायक आणि रॅपर हनी सिंगविरोधात लेखी तक्रार केली आहे. विवेक यांनी हनी सिंगवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ही बाब पैशाच्या व्यवहाराशी संबंधित असल्याचंही स्पष्ट झालं आहे. विवेक यांनी फेस्टिव्हिना नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात हनी सिंग परफॉर्म करणार होता.

त्यानंतरआर्थिक अडचणींमुळे विवेकनी तो कार्यक्रम रद्द केला. असं झाल्याने हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप विवेक यांनी केला आहे. हनी सिंग आणि त्याच्या माणसांनी विवेक यांना मुंबईत सहार येथील हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवले होते, जिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

आणखी वाचा : “वामिकाला डेटवर घेऊन जाऊ का?” IPL मध्ये चिमुकल्याचा विराट कोहलीला प्रश्न; फलक पाहून कंगना रणौत संतापली, म्हणाली…

विवेक यांनी या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर हनी सिंगने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय अजून पोलिसांनीही या संदर्भात एफआयआर दाखल करून घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अशाप्रकारच्या वादात सापडणं हनी सिंगसाठी नवीन नाही. तो त्याच्या गाण्यांमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देतो, असे आरोप त्याच्यावर लागले आहेत. याशिवाय दारू आणि इतर व्यसनांमुळे तो काही दिवस इंडस्ट्रीपासून दूर होता.

त्याची आधीची पत्नी शालिनी तलवार हिनेदेखील हनीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. शालिनीने हनीवर शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा आरोप केला होता. शिवाय आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाण्याच्या बहाण्याने हनी इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवतो, असा आरोपही तिने केला होता.

आणखी वाचा : “द गॉडफादर हा अत्यंत टुकार चित्रपट आहे”; रॅपर हनी सिंगचा माफिया विश्वावरील चित्रपटांबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे तर हनी सिंगच्या ब्रेकअपची सुद्धा सध्या चांगलीच चर्चा होत आहे. हनी सिंग मागील एका वर्षापासून मॉडेल टीना थडानीला डेट करत होता. आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि एकेमकांबरोबरचे फोटोही डिलीट केले आहेत.