लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या तिकिटांच्या आगाऊ विक्रीला सुरुवात झाली आहे. ४८ तासांत झालेल्या तिकीट विक्रीवरून चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळणार असल्याचे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. आता छावा चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती तिकीट विक्री झाली ते जाणून घेऊ…

४८ तासांत ‘इतक्या’ लाख तिकिटांची विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, फक्त पीव्हीआर आयनॉक्स ( PVR Inox)मध्ये ४८ तासांत दोन लाख तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी दोन दिवस बाकी असून शुक्रवारी १४ तारखेला ‘छावा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या तीन दिवसांत आगाऊ तिकीटविक्रीमधून चित्रपटाची किती कमाई होणार आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे आणि महाराणी येसूबाईंची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकांत आहेत. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याबरोबरच ट्रेलरवर कमेंट करीत प्रेक्षकांनी कलाकारांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘छावा’चा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाचे एकीकडे कौतुक झाले; तर दुसरीकडे एका सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराज लेझीम नृत्य करीत असल्याच्या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी तो सीन चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच अभिनेता संतोष जुवेकरने विविध मुलाखतींमधू चित्रपटातील कलाकारांचे कास्टिंग योग्य असल्याचे म्हणत विकी कौशलच्या कामाचे कौतुक केले. विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील त्याने सांगितला. आता हा चित्रपट लोकप्रिय ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.