सध्या हिंदी चित्रपटसृष्टी किंवा बॉलिवूडमध्ये असा एकमेव दिग्दर्शक आहे जो हमखास सुपरहीट चित्रपट देऊ शकतो, तो म्हणजे रोहित शेट्टी. रोहित शेट्टीने बॉलिवूडच्या सगळ्या मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. याबरोबरच त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात आणि त्याचा फायदा संपूर्ण टीमला होतो. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा मल्टीस्टारर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये रोहित सध्या व्यस्त आहे.

नुकतंच ‘द रणवीर शो’ या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने बॉलिवूडची चांगली बाजू आणि वाईट बाजू याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. बॉलिवूड आणि त्यात काम करणाऱ्या लोकांची चांगली बाजू कोणती याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “बॉलिवूडमधील लोक खूप निरागस आहेत. बाहेर एकप्रकारचं बॉलिवूडचं जे वाईट चित्र निर्माण केलं गेलं आहे, पण ते तसं नाही. बॉलिवूडमधील लोकांची वृत्ती ही एका लहान मुलासारखी आहे. त्यांना वाटतं की त्यांनाच सगळी अक्कल आहे, पण तसं नाहीये ते प्रचंड निरागस आहे. एखाद्याने त्यांना खडेबोल सुनावले तर ते निमूटपणे ऐकून घेतात. त्यामुळेच बॉलिवूडची मंडळी निरागस आहेत असं मला वाटतं.”

आणखी वाचा : भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब; ‘RRR’ मधील ‘नातु नातु’ गाणं ऑस्कर २०२३ साठी केलं शॉर्टलिस्ट

याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीची वाईट बाजू मांडताना रोहित म्हणाला, “आपल्यात एकता नाहीये. एकत्र असण्याची ताकद काय असते ती आपल्याला अजून समजलेलीच नाहीये, एकत्र येऊन आपण काय करू शकतो याचा अंदाज आपल्याला अजून नाहीये. जर आपण एकत्र येऊन एका सिंडीकेटप्रमाणे काम केलं तर नक्कीच आपण अधिक प्रगती करू. आपण चित्रपटगृहांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवं. सरकारच्या सहाय्याने आपण अशा अनेक गोष्टी बदल आणू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘सर्कस’ हा चित्रपट गुलजार यांच्या ‘अंगूर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये रणवीर सिंग, वरूण शर्मा, जॅकलिन फर्नांडिज, पूजा हेगडे, जॉनी लिवर, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे मातब्बर कलाकार आहेत. हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.