२५ जानेवारी या दिवशी ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातून किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर हजेरी लावली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल २० रेकॉर्ड मोडीत काढले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे तसेच याने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

या चित्रपटातील संवाद प्रचंड व्हायरल होत आहेत. सगळेच शाहरुखच्या या जबरदस्त कमबॅकचं कौतुक करत आहेत. कित्येक कलाकारांनी ‘पठाण’चं कौतुक केलं आहे. त्यात आता क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचीदेखील भर पडली आहे. वीरेंद्रने पठाण चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे ज्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे

आणखी वाचा : घराबाहेर जमलेल्या असंख्य चाहत्यांना मिळाली ‘पठाण’ची झलक; फ्लाइंग कीस देत किंग खानने केलं त्यांना खुश

सेहवाग हा क्रिकेट तसेच बॉलिवूड यावर बऱ्याचदा टिप्पणी करत असतो. यावेळी त्याने शाहरुख खानच्या या कमबॅकचं स्वागत केलं आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ‘पठाण’मधील एक सीन आपल्याला बघायला मिळत आहे. हा सीन शेअर करताना सेहवागने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “पठाण पाहताना खूप मजा आली. प्रचंड मस्ती आणि टाइमपास.” ही पोस्ट शेअर करताना वीरेंद्रने शाहरुख खानलासुद्धा टॅग केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ने २०० कोटीचा टप्पा पार केला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पठाणमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. शाहरुखने या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका निभावली आहे. रविना टंडन, विकी कौशल, हृतिक रोशनसारख्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखच्या ‘पठाण’चं कौतुक केलं आहे.