Deepika Padukone And Ranveer Singh New House: बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. दोघं नेहमी चर्चेत असतात. गेल्या वर्षी दोघं आई-बाबा झाले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिकाने ८ सप्टेंबर २०२४ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. जिचं नाव दुआ असं आहे. अजूनपर्यंत दीपिका-रणवीरने दुआला सगळ्यांसमोर आणलं नाहीये. पण, बऱ्याचदा विमानतळावर दीपिका-रणवीर लेकीबरोबर दिसले आहेत. लवकरच दोघं लाडक्या लेकीबरोबर नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतीच दीपिका-रणवीरच्या नव्या घराची पहिली झलक पाहायला मिळाली.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दीपिका-रणवीरचं आलिशान घर जवळजवळ पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडमधील नव्या घरात दोघं लेकीसह राहायला जाणार आहेत.

माहितीनुसार, दीपिका-रणवीरच्या नव्या घराची किंमत १०० कोटी रुपये आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे दोघं शाहरुख खान आणि सलमान खानचे शेजारी होणार आहेत. कारण शाहरुखचा मन्नत बंगला आणि सलमानचं गॅलेक्सी अपार्टमेंट एकाच परिसरात आहे. पण, मन्नत बंगल्याचं बांधकाम सुरू असल्याने शाहरुख कुटुंबासह तात्पुरता मुंबईतील पाली हिल परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेला आहे. माहितीनुसार मन्नत बंगल्यावर आणखीन दोन मजले जोडले जाणार आहेत.

दीपिका-रणवीरचे हे ‘ड्रीम हाऊस’ समुद्राच्या अगदी जवळ आहे. बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील दोघांचं घर १६ मजल्यापासून ते १९ मजलापर्यंत आहे. त्यात अंदाजे ११,२६६ चौरस फूट अंतर्गत जागा आहे आणि १,३०० चौरस फूटांचं टेरेस आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघं शेवटचे रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात दीपिका शक्ती शेट्टी आणि रणवीर संग्राम भालेरावच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. सध्या रणवीर ‘धुरंधर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय तो ‘डॉन ३’ चित्रपटात झळकणार आहे.