Deepika Padukone Wanted To Marry Salman Khan : दीपिका पादुकोण व सलमान खान हे दोघे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांनीही आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, आजवर या दोघांनी कधीही एकत्र काम केलेलं नाही. ‘बिग बॉस’ दरम्यान एकदा सलमान खान व दीपिका पादुकोण एकत्र झळकले होते. यावेळी दीपिकाने सलमान खानला प्रपोज केलं होतं. दीपिकाने सलमान खानला प्रपोज केलं तो व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हारयल झाला होता. अशातच आता दोघांच्या या व्हिडीओबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दीपिका तिच्या ‘तमाशा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ‘बिग बॉस’मध्ये गेली होती. यावेळी सलमान खानशी संवाद साधताना तिने तिच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं. परंतु, यासह तिने सलमानला ‘बिग बॉस’च्या मंचावर माझ्याशी लग्न करशील का असं म्हणत चक्क प्रपोज केलं होतं. दीपिका सलमानच्या या व्हिडीओमध्ये दीपिकाने गुडघ्यावर बसून सलमानला “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, विल यू मॅरी मी मिस्टर सलमान खान” असं म्हटलं होतं. त्यावेळी सलमान हे ऐकताच जोरजोरात हसत दीपिकाला, “दीपिका असो किंवा दुसरं कोणीही हे होऊ शकत नाही” असं म्हणाताना दिसला होता.
‘बिग बॉस’च्या मंचावर दीपिकाने सलमान खानला गमतीत प्रपोज केलं होतं. दीपिकाने सलमानला गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर ती “माझ्याकडून काय काय करून घेत आहेत हे लोक” असं म्हणाली होती. यावर सलमानही हसताना दिसत होता. ‘बिग बॉस’च्या ९व्या सीझनमध्ये दीपिका तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी गेली होती आणि त्यावेळी गंमत म्हणून तिने सलमानला प्रपोज केल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. दीपिकाचा ‘तमाशा’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत झळकले होते.
दरम्यान, सलमान खान व दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीपिका अल्लु अर्जूनच्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार ‘सिकंदर’ नंतर सलमान खान अपूर्व लखियाच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता आहे.