Deepika Padukone Shares Family Photo With Dua : बॉलीवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर-दीपिकाला ८ सप्टेंबर २०२४ रोजी गोंडस मुलगी झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोणने घरात लक्ष्मी आल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. आज वर्षभराने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दीपिका-रणवीरने त्यांच्या घरच्या लक्ष्मीचा म्हणजेच दुआचा फेस सोशल मीडियावर रिव्हिल केला आहे.

रणवीर-दीपिकाची लेक नेमकी कोणासारखी दिसते याबद्दल गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. दुआला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्या दुआने आईबरोबर ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.

दीपिकाची लाडकी लेक पारंपरिक लूकमध्ये तयार झाल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय. लाल रंगाचा सुंदर ड्रेस, क्युट हेअरस्टाइल, लाल रंगाची छोटीशी टिकली या लूकमधये बेबी दुआ खूपच क्युट दिसतेय. तर रणवीर सिंहने या मायलेकींना कॉन्ट्रास्ट मॅचिंग होईल अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

दीपिकाने या फोटोंना “दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ” असं कॅप्शन दिलं आहे. तिने एकूण पाच फोटो शेअर केले आहेत. यातील पाचव्या फोटोमध्ये चिमुकली दुआ आईच्या मांडीवर बसून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी सुद्धा दुआचा सोशल मीडियावरील पहिला फोटो पाहून खूश झाले आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकाने लाडक्या लेकीचं नाव ‘दुआ’ ठेवल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय लेकीचं नाव जाहीर केल्यावर दीपिकाने ‘दुआ पादुकोण सिंह…दुआ म्हणजे प्रार्थना’ असा तिच्या नावाचा अर्थ देखील सर्वांना सांगितला होता. आता यंदाच्या वर्षी अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर दुआचा पहिला फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, दुआच्या जन्मानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीमधून काही महिने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आता दीपिका हळुहळू पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करू लागली आहे. मात्र, या सगळ्यात लेकीला वेळ देण्यास अजिबात विसरणार नाही…आत ती आमचं पहिलं प्राधान्य असेल असं अभिनेत्रीने काही मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. सप्टेंबरमध्ये दुआने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्रीने लेकीच्या बर्थडेसाठी खास चॉकलेट केक बनवला होता.