बॉलिवूडमधील अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दीपिका पदुकोण, विद्या बालन, राणी मुखर्जीसह अनेक कलाकार अंत्यदर्शनाला पोहोचले आणि श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, याठिकाणी पोहोचलेली दीपिका पदुकोण मात्र ट्रोल होत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

प्रदीप सरकार यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या दीपिका पदुकोणचे काही व्हिडीओ समोर आले आहेत, त्यात ती वेगळ्या पद्धतीने वागत होती, त्यामुळे लोकांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. दीपिका पदुकोण प्रदीप यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते, त्यासोबत तिने चष्माही लावला होता. तिथून बाहेर पडताना दीपिकाचे हावभाव जरा विचित्र होते.

दीपिकाने तिचे दोन्ही हात मागे एकत्र पकडून ठेवले होते आणि ती फक्त मान हलवत होती. त्यामुळे ती खरंच दुःखी होती की अभिनय करत होती, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे आणि त्यांनी या व्हिडीओवर त्या पद्धतीच्या कमेंट्सही केल्या आहेत.

deepika troll 2
दीपिकाच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, ‘ही दुःख व्यक्त करण्यासाठी गेली होती की चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे’. दुसरा एक युजर म्हणाला, ‘हिचं डोळ्यांचं ऑपरेशन झालंय का, म्हणून तिने काळा चष्मा लावला आहे.’ ‘अंत्यविधीला जाताना काळा चश्मा कोण लावतं’ अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
deepika troll
दीपिकाच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, २०१० मध्ये दीपिका पदुकोण आणि नील नितीन मुकेश स्टारर ‘लफंगे परिंदे’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच अभिनेत्रीने त्यानंतर त्यांच्याबरोबर इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलं नव्हतं.