काही दिवसांपूर्वी कतरिना कैफचा ‘फोन भूत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरने काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बरेचसे चित्रपट दाखल झाले होते. याचा परिणाम ‘फोन भूत’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. या चित्रपटानंतर कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये ती तमिळ सुपरस्टार विजय सेतुपथीसह काम करताना दिसणार आहे. तिच्या ‘टायगर ३’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.
‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाद्वारे ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये कमबॅक करणार आहे असे म्हटले जात आहे. ती याधीही काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली होती. कतरिना सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. दर २-३ दिवसांनी ती इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. तिचे बरेचसे फोटो व्हायरल देखील होता. कतरिनाचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये तिचं बेबी बंप अस्पष्टपणे दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमुळे कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रणबीर-आलिया यांच्यानंतर आता विकी-कतरिनाच्या घरीमध्ये छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या बातमीने चाहते खूश झाले आहेत. पण कतरिनाचा हा बेबी बंप खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोटो ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या चित्रपटामध्ये कतरिना एका आईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यासाठीच खोट्या बेबी बंपची व्यवस्था करण्यात आली होती.
कतरिना आणि विकी हे सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आम्ही दोघेही सध्या कामावर लक्ष देत आहोत. असे म्हटले होते.
