शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला शाहरुख प्रेमी गर्दी करत आहेत. चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच दमदार कमाई केली आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे हाऊसफुल्ल शोज सुरु आहेत. अशातच प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पठाण आणि शाहरुख खानवर भाष्य केलं आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतात. त्यांनी सकाळीच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपगृहात गेले होते. एबीपी टीव्हीशी बोलताना ते असं म्हणाले, “चार वर्षानंतर शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर बघणार आहे. जास्त अपेक्षा ठेवून जाणार नाही कारण मी एक त्याचा चाहता म्हणून चित्रपट बघणार आहे.” ‘पठाण’ चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता त्यावर अनुराग कश्यप म्हणाले, “हा चित्रपट सगळेजण बघणार ज्याला वाद निर्माण करायचा आहे त्यांना करू दे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Oscar Nomintaions 2023 : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्कर नामांकन

‘पठाण’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहता यावा यासाठी ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत. याबाबतीत ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पहिल्या दिवशी चित्रपट पाहता यावा यासाठी बाहुबली २’ची ६ लाख ५० हजार तिकिटं बुक करण्यात आली होती. या तुलनेत ‘पठाण’ चित्रपट पुढे आहे.

Video : शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील सलमान खानचा ‘तो’ सीन लीक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.