सिद्धार्थ आनंद आता हे नाव संपूर्ण जगाला परिचयाचे झाले आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणजे सिद्धार्थ आनंद, या चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. देशातूनच नव्हे तर जगभरातून चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने जगभरातून १००० कोटींच्या वर कमाई केली आहे. अशातच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एक मोठा खुलासा केला आहे.

‘वॉर’, ‘बँग बँग’, ‘सलाम नमस्ते’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या सिद्धार्थने शाहरुख, दीपिका पदुकोणआणि जॉन अब्राहमला घेऊन पठाण हा चित्रपट बनवला. हा चित्रपट भारतीय गुप्तहेरावर आधारित आहे. मात्र चित्रपट प्रदर्षति होण्याआधी बराच वाद निर्माण झाला होता. दीपिकाच्या भगव्या बिकिनीमुळे चित्रपटाला विरोध होताना दिसून आला आता यावरच सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं की “आम्ही कधीच घाबरलो नव्हतो. आम्हाला माहित होतं आमच्या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह असे काही नाही.” त्याने पुढे ‘पठाण’वर टाकलेल्या बहिष्काराला ‘अफवा’ म्हटले आहे.

“या गुंड लोकांचा…” बॉलिवूडच्या कंपूशाहीवर भाष्य करणाऱ्या प्रियांका चोप्राचं शेखर सुमन यांनी केलं समर्थन

चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर ‘पठाण’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. नुकताच ‘पठाण’ प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते आता आणखीनच खुश झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चार वर्षे रुपेरी पडद्यापासून गायब राहिल्यानंतर शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटातून कमबॅक केले. हा चित्रपट २५ प्रदर्शित झाला होता.