‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतेच त्याने एक ट्वीट केले आहे ज्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यासह अभिनेत्यांची भेट घेतली. यावर विवेक अग्निहोत्री आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असं म्हणालेत, “योगी आदित्यनाथ यांनी जेव्हापासून उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून उत्तर प्रदेश राज्य सुरक्षित, आणि चित्रपटकर्त्यांसाठी ते पहिले स्थान बनले आहे. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने इतक्या सुधारणा आणि चित्रपटकर्त्यांबरोबर चर्चा केल्या नाहीत जितक्या नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. तरीही बॉलिवूडमधील काही (यूपी सरकारच्या अनुदानाचे लाभार्थी) त्यांचा तिरस्कार करतात.” अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे.

‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर ते आता ‘व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.