‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रीय असतात. राजकीय सामाजिक मुद्द्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. नुकताच त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ते सुरक्षा रक्षकांबरोबर दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाइल्सच्या यशानंतर ते आता वॅक्सीन वॉर या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. नुकताच त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. मात्र ते यावेळी एकटे नव्हते तर त्यांच्याबरोबर पोलिसांचा फौजफाटादेखील होता. मध्यंतरी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

Jhoome Jo Pathaan : “शाहरुख हा पाकिस्तान नाही..”; चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित होताच प्रसिद्ध अभिनेत्याची टीका

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिला आहे, “काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराची किंमत चुकवावी लागते ते पण एका बहुसंख्य हिंदूंच्या देशात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओमध्ये ते काळ्या रंगाच्या कपड्यात दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “आमच्याच कररुपी पैशातून सुरक्षा घेताय मग तुमचे चित्रपट करमुक्त करा,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “सुरक्षा रक्षकांचा दिखावा करणं बंद करा” अशा शब्दात लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.