बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री दिशा पटानी हीच नाव सामील आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रेक्षक तिच्या चित्रपटाचे आतुरतेने वाट बघत असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या चित्रपटांबद्दलचे सगळे अपडेट प्रेक्षकांना देत असते. तिच्या खात्यात आगामी चित्रपट ही बरेच आहेत. परंतु आता दिशाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. एका बड्या प्रोडक्शनच्या चित्रपटातून दिशाला काढता पाय घ्यावा लागला आहे. इतकंच नाही तर निर्मात्यांनी दिशाच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला विचारणा केली आहे.

२०१९ मध्ये दिशा पटानी आणि एकता कपूर एकत्र मिळून एक चित्रपट करणार असल्याची बातमी समोर आली होती. ‘केटीना’ असे चित्रपटाचे नाव आहे. तेव्हा त्यांच्यात सगळी बोलणी होऊन ‘राधे’च्या चित्रपटाच्या शूटिंग तर दिशा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होती. मात्र आता एकता दिशाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेत आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

आणखी वाचा : क्रिती सेनॉन, करीना कपूर, तब्बू पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार नवा चित्रपट

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार दिशा आणि एकता कपूर यांच्यात मतभेद झाल्याचे समोर आले आहे. एका माहितीदाराने त्यांना अशी माहिती दिली की, लॉकडाऊनपूर्वी २०१९ साली दिशाने या चित्रपटासाठी एकदा कपूर बरोबर दोन-तीन मीटिंग केल्या होत्या. तसंच दिशाने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले. या चित्रपटाचे चार ते पाच दिवस चित्रीकरण झाले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला. लॉकडाऊन नंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्या. यादरम्यान दिशा आणि बालाजी मोशन पिक्चर्स यांच्यात मतभेदही झाले. क्रिएटिव्ह गोष्टी न पटल्यामुळे यांच्यात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे.

हा चित्रपट एकता कपूरच्या जीवनावर आधारित असल्याने तिला यात कोणतीही कमी सोडायची नाही. त्यामुळे हा चित्रपट उत्कृष्ट बनवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण काही केल्या दिशा आणि बालाजी मोशन पिक्चर्स यांच्यात एकमत होऊ शकलं नाही. अखेर दिशाच्या वागणुकीमुळे एकताला या चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्रींचा शोध घेणं भाग पडलं. त्यामुळे दिशाने या चित्रपटातून एग्झिट घेतल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे तर आता एकता कपूर हिने या चित्रपटात दिशा ऐवजी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तारा सुतारिया या दोघींना विचारणा केली आहे.

हेही वाचा : दिशा पटानीची एक्स बॉयफ्रेंडच्या बहिणीबरोबर लंच डेट, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, “तुझं पुन्हा…”

त्यामुळे आता या चित्रपटात कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या चित्रपटाचे कास्टिंग पूर्ण होईपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. प्रमुख भूमिका कोण साकारणार हे ठरल्यावर या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात होईल.