बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ एकेकाळी बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जायचे. मात्र, गेल्यावर्षी त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि दोघे वेगळे झाले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दिशा आणि टायगर वेगळे झाले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान दिशा आणि टायगरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन त्या दोघांमध्ये पॅचअप झालं असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- तृप्ती डिमरीचं अनुष्का शर्माच्या भावाबरोबर ब्रेकअप, अभिनेत्री म्हणाली, “…फरक पडत नाही”

अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ एकाच विमानात प्रवास करताना दिसून आले होते. आता या दोघांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातला आहे. यात टायगर आणि दिशाबरोबर टायगरची बहीण कृष्णाही आहे. व्हिडिओमध्ये टायगर, दिशा आणि कृष्णा मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत. टायगरने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता तर दिशा पांढर्‍या बॅगी पँटसह निळ्या रंगाच्या फुल-स्लीव्ह क्रॉप टॉपमध्ये दिसून आली.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिशा आणि टायगरने कधीही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला नव्हता. गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या मागच्या कारणांचा अद्याप खुलासा झाला नव्हता. गेल्या वर्षभऱात ते कधीही एकमेकांबरोबर दिसले नव्हते. त्यामुळे अचानक ते एकत्र दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. काही जणांनी दोघांना एकमेकांशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.