शाहरुख खानचा नवा चित्रपट डंकी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने ठीक-ठाक कमाई केली आहे. आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राष्ट्रपती भवनात ‘डंकी’चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनात चित्रपटाचे स्क्रीनिंग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राष्ट्रपती भवनात विवक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपटही दाखवण्यात आला होता.

काल म्हणजेच २४ डिसेंबर रोजी रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ‘डंकी’चं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. अवैध स्थलांतरासारख्या गंभीर विषयावर हा चित्रपट बेतलेला आहे. या खास स्क्रीनिंगला लेखक अभिजात जोशी, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि खुद्द शाहरुख खान हजेरी लावणार अशी चर्चा रंगली होती.

आणखी वाचा : “मी खूपच अस्वस्थ…” ‘अ‍ॅनिमल’बद्दल संयमी खेरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “जर प्रेक्षक असे चित्रपट…”

परंतु २४ डिसेंबरला शाहरुख मन्नतबाहेर येऊन सगळ्या चाहत्यांना भेटून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की शाहरुख खान या खास स्क्रीनिंगला उपस्थित नव्हता. अद्याप हे स्क्रीनिंग पार पडल्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी ‘गदर २’ हा चित्रपटदेखील राष्ट्रपती भवनात प्रदर्शित होणार अशी अफवा पसरली होती, पण ‘गदर २’ संसदेच्या नव्या इमारतीमध्ये दाखवण्यात आला होता.

याआधी शाहरुख खानचा ‘पठाण’देखील राष्ट्रपती भवनात दाखवण्यात आला होता. पण हे विशेष स्क्रीनिंग नव्हते. सांस्कृतिक केंद्रात दर आठवड्याला तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी एक चित्रपट दाखवला जातो. ‘पठाण’ तिथेही त्यामुळेच दाखवला होता. ‘डंकी’सुद्धा नेमका असाच दाखवण्यात आला आहे की त्याचं राष्ट्रपतींसाठी खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं ही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखचे चाहते ‘डंकी’ या टॅक्स फ्री करावा अशी विनंतीही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु यावरही कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘डंकी’ लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.