अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल व द्रिशा आचार्य १८ जून रोजी विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नात व रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती. या लग्नात धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी, त्यांच्या मुली ईशा व अहाना गेल्या नव्हत्या. पण, करण व द्रिशाला आत्या ईशाने पोस्ट करून लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नातवाच्या लग्नात धर्मेंद्रनी पहिल्या पत्नीबरोबर दिल्या पोज, ‘अशी’ दिसते सनी देओलची पत्नी पूजा, करणने शेअर केले Family Photos

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर करण आणि द्रिशाचे अभिनंदन केले आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “करण आणि द्रिशा तुमचे अभिनंदन. नेहमी एकत्र आणि आनंदी राहा. भरपूर प्रेम.” आत्या ईशाने करण व द्रिशासाठी केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

esha deol post for karan
ईशा देओलने करण व द्रिशाच्या लग्नानिमित्त टाकलेली इन्स्टाग्राम स्टोरी

धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी ते चित्रपटसृष्टीत नव्हते. प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना चार अपत्ये, सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल आहेत. मात्र, बॉलिवूडमध्ये आल्यावर धर्मेंद्र अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. १९८० मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. हेमा मालिनी यांनी ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.