‘पठाण’ व ‘जवान’सारखे सुपरहिट चित्रपट देऊन बॉलीवूडमध्ये यंदाचे वर्ष गाजवणारा किंग खान शाहरुख खान लवकरच त्याच्या तिसऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ मध्ये दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता त्याचा तिसरा चित्रपट एका महिन्याने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होईल.

शाहरुख खानने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आस्क एसआरके हे सेशन ठेवलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यात चाहत्यांनी काही मजेशीर प्रश्न विचारले. किंग खानने त्या चाहत्यांना भन्नाट उत्तरं दिली. त्यातल्याच एका प्रश्नाने व शाहरुखच्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने २० वर्षांनी सांगितलं सिनेसृष्टी सोडण्याचं कारण; म्हणाली, “चित्रपटाच्या अभिनेत्याने मला त्याच्या खोलीत…”

एक चाहता म्हणाला, “माझी तुला एक विनंती होती.. ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये दाखवू नका, स्टेडियममध्ये दाखवा.” यावर शाहरुख म्हणाला, “होय, मी टीमलाही सांगितलं पण एअर कंडिशनिंग ही समस्या आहे. तुम्हाला या चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलांसह आणि मोठ्यांबरोबर जावं लागेल…एसी नसेल तर अनकंफर्टेबल होईल म्हणून हा चित्रपट २१ डिसेंबरला चित्रपटगृहातच प्रदर्शित करूयात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘डंकी’ हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो राजकुमार हिरानी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.