काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना आणि कल्की कोचलीन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचीही चांगलीच पसंती मिळाली. तीन मित्रांची बॅचलर ट्रीप, त्या ट्रीपवरची धमाल, तीनही मित्रांचा भूतकाळ अन् या बॅचलर ट्रीपवरुन काहीतरी घेऊन परतलेलं ही त्रिकुट सगळ्यांनाच आवडलं होतं.

या चित्रपटातील गाणी, कविता, संवाद सगळंच लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा होत आहे अन् याला निमित्त ठरलंय फरहान अख्तरची एक नवी इंस्टाग्राम पोस्ट. फरहानने नुकताच ‘इम्रान लूक’मधला एक फोटो शेअर करत जोया अख्तरला टॅग केलं आहे. यावर हृतिक रोशन आणि अभय देओल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : ‘टायगर ३’मधले सीन्स कापल्याने इम्रान हाश्मी ‘YRF’वर नाराज; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा दावा

हा लूक शेअर करताना फरहान लिहितो, “इम्रानचा हा लूक काळाचं एक चक्र पूर्ण करणारा ठरला आहे. काय वाटतं बॉईजनी पुन्हा एकदा दुसऱ्या रोड ट्रीपवर जायला हवं का?” असा सवाल फरहानने जोयाला विचारला आहे. यावर अभय देओलने कॉमेंट करत लिहिलं, “मी तर माझी ‘बॅगवती’ २०१२ पासूनच पॅक करून ठेवली आहे तुमचं काय?” तर हृतिक रोशनने यावर कॉमेंट करत लिहिलं, “चला जाऊया.”

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहानच्या या पोस्टखाली चाहत्यांनी कॉमेंट करत या नव्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत असल्याचं सांगितलं. तर एका यूझरने कॉमेंट करत लिहिलं की, “खरंच सिक्वल येणार आहे का? कृपया माझ्या भावना दुखावू नका अन् असा विनोद करू नका.” २०२१ मध्ये फरहानने आलिया भट्ट, कतरिना कैफ व प्रियांका चोप्राला घेऊन ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. फरहानच्या या पोस्टवर “आता आम्हाला मुलींची रोड ट्रीप पाहायची आहे” असं कॉमेंट करत ‘जी ले जरा’ची आठवण करून दिली आहे. याबरोबरच फरहान रणवीर सिंहबरोबर ‘डॉन ३’वर काम करत आहे.