Filmfare Awards 2025 Full Winners List : मनोरंजन सृष्टीतला सर्वांत महत्त्वाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक बॉलीवूड कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. यंदाच्या ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं होस्टिंग अभिनेता शाहरुख खाननं केलं. तसेच करण जोहर आणि मनीष पॉल यांनीही त्याला साथ दिली.

‘लापता लेडीज’ व ‘किल’ या चित्रपटांनी फिल्मफेअर पुरस्कारांवर आपलं वर्चस्व गाजवलं. दोन्ही चित्रपटांनी अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘जिगरा’ चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला, तर अभिषेक बच्चनला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जाणून घ्या, विजेत्यांची संपूर्ण यादी…

फिल्मफेअर २०२५ विजेत्यांची यादी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुरुष (प्रमुख भूमिका) : अभिषेक बच्चन (I Want To Talk) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्त्री (प्रमुख भूमिका): आलिया भट्ट (जिगरा)
  • क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (श्रीकांत)
  • क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रतिभा रांता (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : छाया कदम (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रवि किशन (लापता लेडीज)
  • क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट चित्रपट : शुजीत सरकार (I Want To Talk)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : नितांशी (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : लक्ष्य (किल)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण – दिग्दर्शक : कुणाल केम्मू (मडगाव एक्स्प्रेस), आदित्य सुहास जांभळे (Article 370)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : स्नेहा देसाई (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट कथा : आदित्य धर आणि मोनल ठक्कर (Article 370)
  • सर्वोत्कृष्ट संवाद : स्नेहा देसाई (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम : राम संपथ (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट गीतलेखन : प्रशांत पांडे (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मधुबंती बागची (स्त्री २)
  • सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा (Adapted Screenplay) : रितेश शाह, तुषार जैन (I Want To Talk)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : किरण राव (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन (Sound Design) : सुभाष साहो (Kill)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (Background Score) : राम संपथ (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट VFX : Redefine (मुंज्या)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यनिर्देशन (Choreography) : Bosco‑Caesar (तौबा तौबा)
  • सर्वोत्कृष्ट संपादन (Editing) : शिवकुमार (Kill)
  • सर्वोत्कृष्ट कपडेपट (Costume) : दर्शन जलान (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन (Production Design) : मयूर शर्मा (Kill)
  • सर्वोत्कृष्ट छायांकन (Cinematography) : Rafey Mehmood (Kill)