सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पण आता अशातच गदर 3 बनवला तर अमिषा पटेलने त्यात काम करण्यासाठी मोठी अट ठेवली आहे.

‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील ॲक्शन, या चित्रपटातील कलाकारांची कामं हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं आहे. पण प्रेक्षकांना एक गोष्ट खूप खटकली आणि ती म्हणजे या चित्रपटात तारासिंग आणि सकिनाचे मोजकेच असलेले सीन्स. याबाबत आता अमिषा पटेलने मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘गदर २’च्या निर्मात्यांची धमाकेदार ऑफर, प्रेक्षकांना होणार मोठा फायदा

‘गदर’ मधील तारासिंग आणि सकीना यांच्या जोडीचे भरपूर चाहते आहेत. पण त्यांची ही प्रेम कहाणी दुसऱ्या भागामध्ये फारशी उठून दिसली नाही. ‘गदर २’ मध्ये कमी स्क्रीन टाईम मिळाल्याबद्दल आता तिने भाष्य केलं आहे. चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यांना तारा आणि सकीनाला बघायचं होतं. यावेळी कलाकार म्हणून नि:स्वार्थ भावनेने काम करावं लागलं. यामुळे तारा आणि सकीनाला मागे राहावं लागलं. आम्हाला वेगळ्या प्रकारची फिल्म बनवायची होती. सकीना परत पाकिस्तानात जाऊन पकडली जाणार नाही. ना ही तारासिंग तिला पाकिस्तानात घेऊन जाणार होता. ती अशरफ अलीची मुलगी आहे हे माहित असून सुद्धा. म्हणून सिनेमाचा पहिला हाफ माझा होता आणि दुसरा हाफ सनीचा होता. वरिष्ठ कलाकार म्हणून आम्हाला यात अडचण नाही असं आम्ही म्हणालो.”

हेही वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “गदर ३ ची कथा आल्यावर मी आधीच स्पष्ट करेन की गदर ३ मध्ये जर तारा आणि सकीनाचे सीन्स कमी असतील तर मी तय चित्रपटाला नकार देईन. मी करणारच नाही. मी चाहत्यांना निराश करु शकत नाही. मला माहितीये त्यांना यावेळी काहीतरी कमी असल्यासारखं वाटलं असेल. म्हणूनच हे आमचं कर्तव्य आहे त्यांना जे पाहायचं आहे ते आम्ही दाखवू.”