रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख या जोडप्याकडे कलाक्षेत्रातील आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. या लोकप्रिय जोडीला आता दोन मुलं आहेत. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करून रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना रणौतला आली इरफान खानची आठवण, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

रितेशला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देताना जिनिलीया लिहिते, “आपण नेहमीच अशा गोष्टी ऐकतो की, आई आपल्या मुलांची काळजी घेते आणि बाबांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. बाबा तू सुद्धा कामात खूप व्यग्र असतोस हे आम्हाला माहिती आहे, पण असे असले तरीही तू कायम आम्हाला वेळ देतो. बाबा तू आम्हाला वचन दिले आहेस की, खेळताना, हसताना, रडताना कायम तू आमच्याबरोबर असशील आणि हे वचन तू कायम निभावतोस. आईबद्दल काही तक्रार असेल तरी आम्ही तुला सांगतो कारण, आमचा बाबा दिलेला शब्द नेहमी पाळतोस. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाबा…”

हेही वाचा : प्रसिद्ध गायिका असीस कौरने गुपचूप उरकले लग्न; नवरा आहे बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार

जिनिलीयाने तिची मुलं रियान आणि राहिल यांच्यावतीने रितेशसाठी ही भावूक पोस्ट शेअर केली आहे. “तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, मी तुमचा बाबा आहे ही माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे, माय रिओ आणि रायो…”अशी कमेंट रितेशने या पोस्टवर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिनिलीयाने शेअर केलेली पोस्ट पाहून अनेक सेलिब्रिटींनी “तू खरंच खूप चांगला बाबा आहेस” अशा प्रतिक्रिया देत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला अलीकडेच ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकले, तर जेनिलीयाने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.