अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणीचा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थान येथील सुर्यगढ पॅलेस येथे या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या या विवाहसोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर सिद्धार्थ व कियाराने १२ फेब्रुवारी रोजी (रविवार) मुबंईमध्ये खास रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी उपस्थिती दर्शवली.

आणखी वाचा – Bigg Boss 16चं विजेतेपद हुकल्यानंतर शिव ठाकरेची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, एमसी स्टॅनचा उल्लेख करत म्हणाला, “तो ट्रॉफी जिंकला आणि…”

अभिषेक बच्चनपासून ते अगदी आलिया भट्ट, नीतू कपूर यांच्यापर्यंत सगळेच कलाकार सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी परिधान केले डिझायनर ड्रेस लक्ष वेधून घेणार होते. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखही सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देण्यासाठी रिसेप्शनला पोहोचले.

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

मात्र यावेळी जिनिलीयाला ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. जिनिलीयाने यावेळी थाय कट डिझायनर वेस्टर्न गाऊन परिधान केला होता. जिनिलीयाचा निळ्या रंगामधील डिप नेक गाऊन पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. शिवाय तिच्या हेअरस्टाइलवरुनही तिला ट्रोल करण्यात येत आहे.

आणखी वाचा – “तू जिंकला नाहीस पण…” ट्रॉफी हुकल्यानंतर शिव ठाकरेसाठी ‘बिग बॉस’च्या ‘त्या’ स्पर्धकाची पोस्ट, नेटकरी म्हणतात, “आपला मराठी माणूस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेअरस्टाइमुळे तुझा लूकच वेगळा झाला, तू हे केसांचं काय केलं आहेस?, तुला जमत नाही तो ड्रेस परिधान का केला?, तुझा हा ड्रेस अजिबात आवडला नाही, तू साडीमध्येच शोभून दिसते, तूला हा ड्रेस शोभत नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच वेस्टर्न ड्रेस परिधान न करण्याचा सल्लाही तिला देण्यात आला आहे.