Genelia Deshmukh’s reaction on Deepika Padukone’s Demand of 8 Hour’s Shift : जिनिलीया देशमुख लवकरच ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच नुकतच जिनिलीयाने दिवसाला १० तास काम करण्याबद्दलची तिची प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीसुद्धा अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दीपिका पादुकोणच्या दिवसाला आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली होती.

जिनिलीया देशमुखने ‘झूम’शी संवाद साधताना तिची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जिनिलीयाने चित्रपटासाठी काम करत असताना दिग्दर्शकांनी शिफ्टची वेळ वाढवली तर त्यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “हे अवघड आहे, पण अशक्य नाही. मी दिवसाला १० तास काम करते; कधी कधी असंही होतं जेव्हा दिग्दर्शक ११-१२ तासांच्या शिफ्टही ठेवतात. मला असं वाटतं हे बरोबर आहे. आपल्याकडे फक्त शिफ्टनुसार तडजोड करण्यासाठी पुरेसा वेळ असायला हवा. एक किंवा दोन दिवस जास्तीचं काम करणं हा समंजसपणा आहे.”

दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून एक्झिट घेतली. तिने एक्झिट घेण्यापूर्वी या दोघांमध्ये दिवसाला आठ तास काम करण्यावरून आणि अभिनेत्रीच्या इतर काही मागण्यांवरून मतभेद झाले होते. संदीप रेड्डी वांगा दीपिकाच्या मागण्यांशी सहमत नव्हते. यावेळी अभिनेत्रीला प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम, अजय देवगण, नेहा धुपिया यांसारख्या कलाकारांनी तिच्या या मागणीशी सहमती दर्शवत पाठिंबा दिला होता; तर दीपिकाच्या ‘स्पिरिट’मधील एक्झिटनंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीची चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीया देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अभिनेता आमिर खानची निर्मिती असलेल्या आणि आर एस प्रसन्न दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’मधून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. यामधून ती पहिल्यांदाच आमिर खानसह काम करत आहे. यासह जिनिलीया ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यातील तिच्या भूमिकेबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, रितेश देशमुख, जिनिलीया, महेश मांजरेकर, संचिन खेडेकर, अभिषेक बच्चन यांसारखे कलाकार या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत.