शाहरुख खानची पत्नी गौरी खान कलाक्षेत्रामध्य कार्यरत नसली तरी ती कायम चर्चेत असते. आज तिचा ५२वा वाढदिवस आहे. गौरी इंटेरियर डिझायनर म्हणून काम करते. या क्षेत्रामध्ये तिला अधिक रस असल्याने सुपरस्टारची पत्नी असली तरी ती अजूनही काम करत आपली आवडत जोपासते. शाहरुख-गौरी गेली ३१ वर्ष सुखाचा संसार करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? लग्न झाल्यानंतरही शाहरुख एका अभिनेत्रीच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता.

१९९१मध्ये शाहरुख-गौरीने लग्न केलं. आता त्यांना आर्यन, सुहाना, अबराम अशी तीन मुलं आहे. पण शाहरुख-गौरीचं वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. गौरीबरोबर लग्न झाल्यानंतरही शाहरुख सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमामध्ये पडला होता. त्यानंतर शाहरुख-गौरीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं.

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राबरोबर शाहरुखचं नाव जोडलं गेलं. या दोघांमध्ये जवळीक अधिक वाढत गेली. याबाबत गौरीला समजातच तिला राग अनावर झाला. यादरम्यान शाहरुख-गौरीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं अशी चर्चा होती. पण त्यानंतर मात्र गौरीनेच आपलं वैवाहिक आयुष्य सांभाळण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – विजय देवरकोंडाला ऑनस्क्रिन किस केलं अन्…; ‘त्या’ बोल्ड सीनबाबत रश्मिका मंदानाचा खुलासा, म्हणाली, “खूप रडले आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे प्रियांकाबरोबर काम न करण्याचा सल्ला गौरीने शाहरुखला दिला होता. या दोघांचं लग्नही तीन पद्धतीने झालं. आधी कोर्टामध्ये शाहरुख-गौरीने लग्न केलं. त्यानंतर मुस्लिम आणि पंजाबीपद्धतीने दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आता बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांमध्ये शाहरुख-गौरीचं नाव आवर्जुन घेतलं जातं.