ज्येष्ठ अभिनेते व शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. २९ मे १९५४ रोजी जन्मलेले पंकज कपूर सिनेविश्वात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज पंकज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलचे खास किस्से जाणून घेऊयात.

दमदार अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं

पंकज कपूर यांनी १९८२ मध्ये ‘आरोहण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात महात्मा गांधींचे दुसरे सचिव प्यारेलाल यांची भूमिका साकारली होती, या चित्रपटाला एक दोन नव्हे तर आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या पंकज कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. या अभिनय प्रवासासोबतच पंकज कपूर यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं.

फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांचं आहे प्रकरण

नीलिमा अझीम यांच्याशी पहिलं लग्न

पंकज कपूर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला होता. तिथे त्यांची भेट नीलिमा अझीम यांच्याशी झाली. त्या कथ्थकचे प्रशिक्षण घेत होत्या. दोघांची ड्रामा स्कूलमध्येच मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी १९७९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचा मुलगा शाहिद कपूरचा जन्म झाला.

“मी त्यांना शिव्या द्यायचो आणि…” अशाप्रकारे सुनील शेट्टीने केलेला अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना

मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले आणि जवळजवळ ९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पंकज आणि नीलिमा वेगळे झाले तेव्हा शाहिद केवळ अडीच वर्षांचा होता. एका मुलाखतीत नीलिमा यांनी घटस्फोटाचे कारण सांगितले होते. “वेगळे होण्याचा निर्णय माझा नाही, तर पंकजचा होता. ते आयुष्यात पुढे गेले होते. माझ्यासाठी पुढे जाणं सोपं नव्हतं, त्यासाठी मला बरीच वर्षे लागली. हे सर्व स्वीकारणं माझ्यासाठी कठीण होतं. ब्रेकअप नंतर सर्व काही आठवत राहतं, ज्यामुळे त्या गोष्टी विसरणं आणि पुढं जाणं कठीण होते,” असं नीलिमा म्हणाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरं लग्न

नीलिमा अझीमपासून घटस्फोट घेतल्यानंतर पंकज कपूर यांच्या आयुष्यात सुप्रिया पाठक यांची एंट्री झाली. दोघांची पहिली भेट १९८६ साली ‘नया मौसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती, तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. सुप्रिया पंकजला भेटल्या तेव्हा त्याही घटस्फोटित होत्या. दोघांना एकमेकांवर प्रेम झालं आणि ते वेळ एकत्र घालवू लागले. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नाचा विचार करू लागले पण, सुप्रियांच्या आईला हे नातं अजिबात मंजूर नव्हतं. मात्र, सुप्रिया यांनी आईच्या विरोधात जाऊन पंकज कपूर यांच्याशी १९८९ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक मुलगी सना आणि मुलगा रुहान कपूर यांचे पालक झाले.