बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, त्यानंतर सध्या ती तिचा पहिला हॉलीवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मुळे चर्चेत आहे. ११ ऑगस्ट रोजी आलियाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोट मुख्य भूमिकेत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचं शुटिंग झालं होतं, त्यावेळी आलिया गरोदर होती.

सनी-बॉबी अन् इशा-अहाना, चारही सावत्र भावंडांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्यावर वडील धर्मेंद्र म्हणाले…

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात गुड न्यूज देणाऱ्या आलियाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सर्वात आधी कुणाला सांगितलं होतं, याबाबत खुलासा केला आहे. टॉम हार्पर दिग्दर्शित ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये गॅल गॅडोट आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. या दोघींमध्ये खूप चांगला बाँड आहे. एका मुलाखतीत आलियाने सांगितलं की तिने तिच्या गर्भधारणेबद्दल कुणालाच माहिती दिली नव्हती. कारण सुरुवातीचे तीन महिने त्याबद्दल फार लोकांना सांगायचं नसतं.

‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी तुफान कमाई, ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला

आलिया चित्रपटाचे शुटिंग करत असल्याने तिला ‘हार्ट ऑफ स्टोन’मधील कलाकारांना त्याबद्दल सांगावं लागलं. सर्वात आधी तिने गॅल गॅडोटला सांगितलं होतं. गरोदर असल्याने तिने चित्रपट सोडण्याचा विचार केला होता का, असं विचारलं असता आलियाने नकार दिला. गॅल गॅडोटनंतर तिने चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांना सांगितलं.

“मी जेव्हा गॅडोटला माझ्या प्रेग्नेंसीची बातमी दिली तेव्हा ती खूप उत्साही आणि आनंदी होती, त्यानंतर तिने सेटवर माझी काळजी घेतली, शूट दरम्यान हायड्रेटेड कसे राहायचे याबद्दल मला टिप्स दिल्या, ज्यामुळे मला खूप मदत झाली. याशिवाय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक टॉम हार्पर यांनाही माझ्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती असणं आवश्यक होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं. सर्वांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं आणि काळजी घेतली,” असं आलिया म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉम हार्पर दिग्दर्शित ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून आलिया भट्टने हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. गॅल गॅडोट आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय यात जेमी डोरनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.