ऐश्वर्या राय व सलमान खान यांनी पहिल्यांदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा करतानाच सलमान व ऐश्वर्या प्रेमात पडले. दोघांच्या प्रेमाची सगळीकडे चर्चा होती, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांचं ब्रेकअप झालं.

सलमान खान व ऐश्वर्या राय दोघांबरोबरही अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी काम केलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्याबरोबर काम करण्याच्या तिच्या आठवणी सांगितल्या. सलमान अनेकदा सेटवर ऐश्वर्याला भेटायला यायचा. सलमान रात्री ऐश्वर्याबरोबर थांबायचा आणि सकाळी निघून जायचा, असं हिमानी म्हणाल्या. इतकंच नाही तर सलमान जेव्हा ऐश्वर्यावर चिडायचा तेव्हा हिमानी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायच्या.

हैदराबादला जायचा सलमान खान

रेड एफएम पॉडकास्टशी बोलताना हिमानी म्हणाल्या की त्यांनी ऐश्वर्याबरोबर ‘आ अब लौट चलें’ मध्ये काम केले होते. नंतर दोघींनी ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ सिनेमे केले. “ऐश्वर्या तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होती. आम्ही तेव्हा खूप जवळ होतो,” असं हिमानी यांनी सांगितलं. हैदराबादमध्ये ‘हमारा दिल आपके पास है’ चे शूटिंग करतानाच्या आठवणी हिमानी यांनी सांगितल्या. “आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करायचो. हा तो काळ होता जेव्हा ती व सलमान इंडस्ट्रीत खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते. त्यावेळी सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला येत असे आणि सकाळी निघून जायचा,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.

हिमानी यांनी ऐश्वर्या व सलमान खानचं नातं जवळून पाहिलं होतं, पण तरीही या दोघांच्या ब्रेकअपबद्दल बोलणं त्यांनी टाळलं. त्यांचं नातं टिकू शकलं नाही, पण नेमका काय प्रॉब्लेम होता, ते त्या दोघांनाच जास्त चांगलं माहित असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

रिलेशनशिपमध्ये असताना सलमान ऐश्वर्यावर खूपदा चिडायचा. दोघेही त्यांच्या समस्या हिमानी यांना सांगायचे. हिमानी यांनी असाच एक प्रसंग आठवला. एकदा सलमान व ऐश्वर्याचं भांडण झालं होतं, तेव्हा चिडलेल्या सलमानला त्यांनी शांत केलं होतं.

सलमान खान ऐश्वर्यावर चिडलेला

“मला आठवतंय की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेकबरोबर रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान आला होता. तो मला म्हणाला, ‘मी काय म्हणतोय, समजवा हिला. ही स्वतःला खूप सुंदर समजते, पण तिला वहीदा रहमान यांच्याकडे बघायला सांगा.’ यानंतर मी त्याला शांत राहायला आणि गप्प बसायला सांगायचे,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.

ऐश्वर्या राय सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर काही काळ विवेक ओबेरॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचंही ब्रेकअप झालं. नंतर २००७ मध्ये तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. चार वर्षांनी २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा २०११ मध्ये झाला.