Housefull 5 Public Review in Marathi : ‘हाऊसफुल’ या गाजलेल्या फ्रेंचायझीचा पाचवा भाग ‘हाऊसफुल 5’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलीवूड स्टार्सची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. आज (६ जून रोजी) हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? ते जाणून घेऊयात.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या भूमिका आहेत. तसेच जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे आणि संजय दत्त असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.
‘हाऊसफुल 5’ पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी ‘हाउसफुल 5’ बद्दल काय रिव्ह्यू दिले आहेत, ते पाहुयात.
पाहा पोस्ट
‘हाऊसफुल 5’ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट आहे. सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलंय, अशी पोस्ट एक्सवर एका युजरने केली आहे.
एका युजरने हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाचे बजेट व क्रेझ खूप होती, पण चित्रपट तेवढा खास नसल्याची पोस्ट या युजरने केली आहे.
चित्रपटाची शेवटची ३० मिनिटं जबरदस्त आहेत. तुम्हाला वाटतं की ट्विस्ट संपला, पण तेव्हाच अजून एक ट्विस्ट येतो. हा फक्त कॉमेडी चित्रपट नाही, तर थ्रिलरही आहे, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
अक्षय कुमार कॉमेडीचा किंग आहे, हाऊसफुल 5 चित्रपट आवडला, असं एका युजरने म्हटलंय.
समीक्षक तरण आदर्श यांनी हाऊसफुल 5 धमाल चित्रपट आहे, अशी पोस्ट केली आहे.
हाऊसफुल ५ च्या पहिल्या हाफची सुरुवात चांगली झालीये. काही संवाद मजेदार आहेत, थ्रिल एलिमेंट ठीक आहे. पण कथा काही फार वेगळी नाही नाही. एकदा पाहण्यासारखा चित्रपट आहे, असं एका युजरने म्हटलंय.
थिएटरमध्ये हाऊसफुल ५ ची क्रेझ कशी आहे ते पाहा म्हणत एका प्रेक्षकाने थिएटरमधील व्हिडीओ शेअर केला आहे.
कंटाळवाणा सिनेमा, पण सस्पेन्स खूप चांगला आहे. स्टारकास्ट खूप चांगली आहे, पण सर्वांना ते नीट स्क्रीन टाइम देऊ शकले नाही. या चित्रपटातील किलर कोण, त्याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही असं एका युजरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.