अभिनेत्री करिश्मा कपूर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. २५ जून १९७३ रोजी जन्मलेली करिश्मा कपूर आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सध्या करिश्मा कपूर तिच्या मुलीबरोबर राहते. ७ वर्षांपूर्वी तिचा बिझनेसमन संजय कपूरसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर पोटगीमध्ये करिश्माला करोडो रुपये मिळाले होते.

हेही वाचा- “ती मरुन जाईल” आर्यनच्या जन्मावेळी गौरीची ‘ती’ अवस्था बघून शाहरुख खान थरथर कापत होता, खुलासा करत म्हणाला…

करिश्मा कपूरने तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. २००३ मध्ये तिने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले पण लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट चांगलाच चर्चेत होता. करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप केले होते. करिश्माने संजयविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तर दुसरीकडे संजयने करिश्मा कपूर लोभी आहे आणि तिने पैशासाठी लग्न केले असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा- Video : “राघव चड्ढांबरोबर लग्न केव्हा करणार?” पापाराझींच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया; व्हिडीओ व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्माला १४ कोटी रुपये आणि एक आलिशान घर पोटगी म्हणून दिले होते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की करीश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजय कपूरने मुलांच्या जबाबदारीसाठी १० कोटी रुपयांचा ट्रस्ट बनवला होता. मुलांचे शिक्षण इतर खर्चासाठी त्याला पैसे द्यावे लागतात. मिळालेल्या माहितीनुसार संजय कपूर सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजनचे अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती १२० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरात संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केले.

हेही वाचा- Karisma Kapoor Birthday : करिश्मा कपूर कशी झाली बॉलीवूडची ‘लोलो’? जाणून घ्या अभिनेत्रीच्या टोपणनावामागील रंजक कहाणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००३ नंतर करिश्माने काम करणे कमी केले. ‘मेरे जीवन साथी’ हा चित्रपट २००३ साली बनला होता पण चार वर्षांच्या विलंबानंतर तो प्रदर्शित झाला. पण कालांतराने तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. दरम्यान, करिश्मा कपूरने ‘नच बलिये’ सारख्या अनेक शोला जजही केले होते. ”ओम शांती ओम’ चित्रपटात ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.