बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गेल्या काही दिवसांत त्याच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. नेहमी फिटनेस आणि लूकमळे तरुणींना वेड लावणारा हृतिक यंदा मात्र मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला उपस्थित राहिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा नुकताच साखरपुडा पार पडला. भाग्यश्रीच्या साखरपुड्याच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह हजेरी लावली. या रिसेप्शनसाठी हृतिक आणि त्याच्या गर्लफ्रेण्डने पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केले होते. त्यांचा रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडीओ ‘वूम्पला’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटात सायली संजीवची वर्णी; पहिल्यांदाच साकारणार ऐतिहासिक भूमिका

हेही वाचा >> “तेव्हा राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेतून…”, सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा

भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडेचा साखरपुडा ९ ऑक्टोबरला पार पडला. विजय हा एक मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने हृतिकचा चित्रपटातील लूकसाठी मेकअप केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रम वेधा चित्रपटासाठीही त्याने हृतिकचा मेकअप केला होता. फोटोशूट आणि जाहिरातीच्या शूटिंगसाठीही त्याने हृतिकचे वेगवेगळे लूक डिजाइन केले आहेत.  

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाग्यश्रीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांना साखरपुडा केला असल्याची माहिती दिली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.