अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या पुढच्या रीलिज होणाऱ्या ‘फायटर’ चित्रपटाच्या तयारीत आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. चित्रपट रीलिज होण्याआधी सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने हृतिक रोशनच्या पहिल्या फोटोशूटबद्दल एक अज्ञात खुलासा शेअर केला; ज्यात अभिनेता हृतिक रोशन याने आपली ओळख लपवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.

अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डब्बू रत्नानीने हृतिक रोशनसोबतच्या कोलॅबरेशनच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली, डब्बू रत्नानी म्हणाला “मला माहितही नव्हते की तो राकेश रोशन यांचा मुलगा आहे. त्याने मला काहीच सांगितले नाही, त्याने मला त्याचे नाव हृतिक असल्याचे सांगितले. आयुष्यातील पहिल्या पोर्टफोलिओसाठी तो ज्या प्रकारे पोज देत होता, त्या पोज, त्याचा आत्मविश्वास आणि एकंदर हावभाव पाहून मी भारावून गेलो. जेव्हा मी त्याला सांगितले की, तो यात खूप चांगला आहे तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला.”

हेही वाचा… ‘फायटर’ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई, आगाऊ बुकिंगमधून कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; ८६,५१६ तिकिटांची झाली विक्री

जेव्हा शूट संपले तेव्हा डब्बूने हृतिकला सांगितले की, फोटो मिळण्यासाठी सहसा दोन दिवस लागतात; पण हृतिकला त्या फोटोंची तत्काळ गरज होती. फोटो लॅबला कॉल केल्यावर डब्बूला सांगण्यात आले की, दुसऱ्या दिवशीच फोटो दिले जाऊ शकतील. त्यामुळे त्या दिवशी अभिनेता हृतिक रोशन फोटोग्राफरसह लॅबमध्ये फोटो घेण्यासाठी गेला होता.

त्यानंतर फोटोंचे कौतुक करण्यासाठी डब्बू रत्नानीला राकेश रोशन यांचा फोन आला आणि तेव्हाच त्याला समजले की, हृतिक हा त्यांचा मुलगा आहे. हृतिकने आपली ओळख उघड केली नाही. कारण त्याला फोटोग्राफरवर दडपण निर्माण करायचे नव्हते.

हेही वाचा… मुलीच्या लग्नानंतर आमिर खान दुसऱ्या पत्नीबरोबर रोड ट्रीपवर; किरण रावने शेअर केलेले फोटो चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फायटर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर सिद्धार्थ आनंदच्या एरियल अ‍ॅक्शन चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या भूमिकांत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात हृतिक आणि दीपिकाने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. हृतिक पॅटी; तर दीपिका मिन्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.