IMDb’s Most Popular Indian Stars of 2024 : IMDb ने २०२४ मधील लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहीर केली आहे. चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटींच्या माहितीच्या आधारे ही यादी तयार केली जाते. आयएमडीबीने २०२४ मधील सर्वाधिक लोकप्रिय टॉप १० कलाकारांची यादी घोषित केली आहे. IMDb वरील दर महिन्याच्या २५ कोटींहून जास्त प्रेक्षकांच्या खऱ्या पेज व्ह्यूजनुसार ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. यंदा या यादीत तृप्ती डिमरी पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी तिचे ‘बॅड न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’, आणि ‘भूल भुलैया 3’ हे चित्रपट आले. या तिन्ही चित्रपटातील तिच्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

“२०२४ मधील सर्वात लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या IMDb यादीमध्ये दिग्गज व उदयोन्मुख प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे, यातून भारतीय मनोरंजन जगताचे वैविध्यपूर्ण प्रतिबिंब दिसते,” असं IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया म्हणाल्या. “आमच्या वार्षिक यादीमध्ये जागतिक प्रेक्षकांच्या बदलत्या चॉईसची झलक दिसते. तसेच शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन असे दिग्गज कलाकार आजही प्रेक्षकांना कसे आकर्षित करतात, हे दिसून येतं. दुसरीकडे तृप्ती डिमरी आणि शर्वरी हे नवीन कलाकार प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. भारतीय चित्रपट व त्यातील कलाकारांना मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता कशी वाढत आहे, हेसुद्धा या वर्षीच्या यादीमधून दिसते,” असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट

२०२४ मधील IMDb चे टॉप १० लोकप्रिय भारतीय कलाकार


१. तृप्ती डिमरी
२. दीपिका पादुकोण
३. इशान खट्टर
४. शाहरूख खान
५. सोभिता धुलिपाला
६. शर्वरी
७. ऐश्वर्या राय बच्चन
८. समांथा रूथ प्रभू
९. आलिया भट्ट<br>१०. प्रभास

most popular indian stars of 2024
२०२४ मधील लोकप्रिय कलाकारांची यादी (फोटो – पीआर)

Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट कसा आहे? सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृप्ती डिमरीने चाहत्यांचे मानले आभार

चाहत्यांचे आभार मानत तृप्ती डिमरी म्हणाली, “2024 च्या IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक मिळ‌णे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या चाहत्यांचे आभार. ही माझ्या कठोर परिश्रमाची पावती आहे. मी वर्षभरात अनेक चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. हे वर्ष माझ्यासाठी खूपच संस्मरणीय राहिलं.”