बॉलीवूड अभिनेता आमिर खानची लेक आयराने नुपूर शिखरे बरोबर १० जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा लग्सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

आयराने लग्नासाठी पांढरा शुभ्र गाऊन ड्रेस आणि नुपूरने बेज रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता. या वेस्टर्न लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. आई रिना दत्ता आणि वडील आमिर खानचा हात धरून आयराने लग्नमंडपात प्रवेश केला. लग्नानंतर आयरा व नुपूरचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात आमिर खान भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

टाईम्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आयरा व नुपूरच्या लग्नानंतर आता मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीसाठी २५०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगण्यात य़ेत आहे. मुंबईतील मुकेश अंबानींच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयरा व नुपूरच्या या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, कपूर कुटुंब, सनी देओल, बॉबी देओल यांचा समावेश आहे. तसेच काही तेलगू कलाकारांनाही आमिरने या रिसेप्शन पार्टीचे निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- Video: लेकीच्या लग्नातला आमिर खानचा ‘आती क्या खंडाला’ गाण्यावरील डान्स पाहिलात का?, व्हिडीओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधण्याअगोदर आयरा व नूपरने मुंबईत नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नात मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये असे बरेच मराठी कलाकार उपस्थित होते.