आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे लवकरच पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. ३ जानेवारीला दोघांचं नोंदणी पद्धतीने लग्न झालं. त्यानंतर आता दोघांचा समारंभपूर्वक शाही लग्नसोहळा होत आहे. काल, ८ जानेवारीला आयराला नुपूरच्या नावाची मेहंदी काढली. या मेहंदी सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. मेहंदी सोहळ्यातील नुपूरच्या ‘जुगनू’ गाण्यावरील जबरदस्त डान्सने सगळ्यांचं वेधून घेतलं आहे. अशातच पजामा पार्टीतला एक व्हिडीओ समोर आहे; जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, आयरा-नुपूर १० जानेवारीला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्यात जवळपास २५० पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी ताज आरवली हॉटेलच्या १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या लग्नसोहळ्यात सहभागी होणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारण्यास आयरा व नुपूरने नकार दिला आहे. पण या लग्नापूर्वी काही पार्टी आणि सोहळे होत आहेत. काल मेहंदी सोहळ्यानंतर पजामा पार्टी झाली. या पार्टीत नुपूरने मित्रांसह लुंगीवर भन्नाट डान्स केला.

हेही वाचा – ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, “आता तर मी निषेध…”

नुपूरचा हा व्हिडीओ ‘वरिंदर चावला’ (Varinder Chawla) या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत नुपूर मित्रांसह लुंगी घालून पजामा पार्टीत एन्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील ‘लुंगी डान्स’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या जावयाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: हर्षवर्धनच्या नव्या डावावर विश्वास ठेवून सागर सईला देतो वाईट वागणूक अन् मग मुक्ता…, नक्की काय घडतं? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उदयपूरमध्ये आयरा-नुपूरचा शाही लग्नसोहळा झाल्यानंतर मुंबईत एका पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.