आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर चर्चेत आले होते. अडीच वर्षांपूर्वी हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. काही दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला या प्रकरणात क्लीन चीट मिळाली होती. आता समीर वानखेडे यांनी जातीवरून झालेली टीका आणि त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
आर्यन खान प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्याबद्दल पश्चात्ताप आहे का? ते अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं का? ‘लल्लनटॉप’ च्या मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नांवर समीर वानखडे म्हणाले, “मला कोणत्याही प्रकारची खंत, पश्चात्ताप नाही. मला माझा चेहरा फक्त दोन लोकांना दाखवायचा आहे. इमेज वगैरे मोठ्या लोकांसाठी आहे, मला काही फरक पडत नाही. मी लाच घेतोय, भ्रष्टाचार करतोय, पैशांसाठी काम करतो असं म्हणणं लोकांसाठी खूप सोपं आहे. मी हे कोणाला समजावून सांगण्यासाठी करत नाही. प्रत्येकाचा हेतू पैसा नसतो आणि वाईट काम नसतं. काही अधिकारी चांगले आहेत. अजूनही काही लोक आहेत, ज्यांच्यासाठी पैसा ही प्रेरणा नाही. लोक खरंच देशसेवेसाठी काम करतात. आपण प्रत्येक गोष्टीचा पैशाशी संबंध जोडू शकत नाही.”
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
समीर यांना विचारण्यात आलं की सरकारी मंत्रालये आणि मंत्रालयांनी नेमलेल्या तपास समित्या त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नाहीत आणि वारंवार मॉनिटरिंगबद्दल बोलत आहेत. त्यावर ते म्हणाले, “मलाही सर्वकाही सादर करण्यासाठी संधी मिळाली हे चांगलं आहे. बघूया काय होतंय ते. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.”
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
जातीमुळे लक्ष्य केलं? समीर वानखेडे म्हणाले…
तुम्ही दलित समाजाचे असल्याने त्यांना वारंवार लक्ष्य केलं जात आहे का? या प्रश्नावर समीर म्हणाले, “मला याचे उत्तर वेगळ्या पद्धतीने द्यायचे आहे कारण हे प्रकरण पटियाला हाऊस कोर्टातही प्रलंबित आहे. पण मला एकच सांगावंसं वाटतंय की माझे ईश्वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी माझ्या रक्तात आहेत. त्यांनी आम्हाला संविधान दिले. त्यांनी आम्हाला चांगले कपडे घालायला, चांगले जगायला शिकवले आहे.”
समीर वानखेडे पुढे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज ते इथवर येऊ शकले. मान उंचावून समाजात चालण्याची संधी मिळाली ही आंबेडकरांची देणगी आहे. कोणी शिवीगाळ केली किंवा काही त्रास झाला तर ते त्याविरोधात लढतील, असंही वानखेडेंनी सांगितलं.