बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं चांगलंच खास ठरलं. ‘पठाण’च्या धमाकेदार यशानंतर शाहरुखच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. लोकांनी चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. आता शाहरुख लवकरच सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे.

याबरोबरच शाहरुख ‘धूम ४’मध्येही झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुखचा एक खास व्हिडीओ शेयर केला ज्यात तो एका उंच इमारतीवरुन उडी मारताना दिसत आहे. याबरोबरच प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येत असल्याचंही या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे.

आणखी वाचा : कंगना रणौतचा ‘Emergency’ नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार नाही; ट्वीट करत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

हा व्हिडीओ बाहेर येताच शाहरुखच्या चाहत्यांनी तो ‘धूम ४’मध्ये दिसणार याची चर्चा सुरू केली. काहींनी तर हा छोटासा व्हिडीओ ‘धूम ४’चा टीझर असल्याचंही स्पष्ट केलं. अशातच आता यामागील सत्य बाहेर आलं आहे. यश राज फिल्म्स सध्या ‘धूम ४’वर काम करत नसून शाहरुख खानही या चित्रपटात दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रीपोर्टनुसार हा व्हिडीओ कोल्डड्रिंकच्या जाहिरातीचा एक भाग आहे. ही अॅक्शनने भरलेली जाहिरात सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केली आहे. काही दिवसांपूर्वी या जाहिरातीसाठी शाहरुखने शूट केल्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे यश राजच्या ‘धूम ४’बद्दल सोशल मीडियावर येणारे अपडेट हे पूर्णपणे खोटे आहेत. सध्या ते त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’वर लक्षकेंद्रित करत आहे, तर शाहरुख खान त्याच्या आगामी राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’च्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे.