बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे लाखो चाहते आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. जान्हवीने आतापर्यंत धडक चित्रपटातद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला अनेकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. मात्र अनेकदा जान्हवीला ट्रोल केले जाते. नुकतंच तिने या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे.

जान्हवीने २०१८ मध्ये धडक चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर ती गुंजन सक्सेना, रुही, गुडलक जेरी यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कायमच कौतुक पाहायला मिळाले. तिने विविध विषयांवरच्या चित्रपटात काम केले आहे. जान्हवीच्या मिली चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा : “…अन् तिथून आमच्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला” सिद्धार्थ जाधवने सांगितला कुशल बद्रिकेचा ‘तो’ किस्सा

जान्हवी ही श्रीदेवी यांची मुलगी असल्याने तिला चित्रपटात काम दिले जाते, अशी टीका कायम तिच्यावर होत असते. अनेकदा तिच्या आईशी तिची तुलना केली जाते. मात्र या गोष्टीचा जान्हवीला खूप त्रास सहन करावा लागतो. नुकतंच एका मुलाखतीत जान्हवीने याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले.

“माझे वडील बोनी कपूर इतकेही श्रीमंत नाहीत की ते मला चित्रपट मिळवून देऊ शकतात. मला आता माझ्या कामामुळे चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. मी त्या लोकांना मला चित्रपटात कास्ट करण्यासाठी पैसे देत नाही. मी इतकी ही श्रीमंत नाही किंवा माझे वडील इतकेही श्रीमंत नाही की मी त्यांना चित्रपटासाठी पैसे देऊ शकते. तसेच सिनेसृष्टीत कोणाचेही हृदय इतके मोठे नाही की स्वत:चे नुकसान करुन ते एखाद्या स्टार किड्सला लाँच करतील”, असे जान्हवी कपूर म्हणाली.

आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जान्हवी कपूर लवकरच ‘मिली’ आणि ‘बवाल’ या चित्रपटात झळकणार आहे. शिवाय तिची लहान बहीण खुशी कपूरही झोया अख्तरच्या आगामी सीरिजमधून पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्या दोघींचेही सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.