लहानपणी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या अभिनेत्रींनी पुनरागमन करत इंडस्ट्रीमध्ये आपली नवी ओळखही निर्माण केली आहे. आलिया भट्टपासून ते श्रीदेवीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी लहान वयातच आपल्या करिअरची सुरुवात केली. जन्नत जुबैर हे त्यातलंच एक नाव आहे.

जन्नतने वयाच्या सातव्या वर्षी ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. ‘काशी- अब ना रहें तेरा कागज कोरा’ आणि ‘फुलवा’ या मालिकांमुळे प्रसिद्धी मिळाली. ‘लव्ह का दि एंड’ या चित्रपटात जन्नतने श्रद्धा कपूरच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती, यामुळे तिला लोकप्रियता मिळाली.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…
marathi actress shares reels on gujarati song
Video : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींनी गुजराती गाण्यावर धरला ठेका, ऑफस्क्रीन ‘असं’ आहे बॉण्डिंग

जन्नत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते व तिला लाखो करोडो चाहते फॉलो करतात. फॉलोअर्सच्या स्पर्धेत जन्नतने सुपरस्टार शाहरुख खानलासुद्धा मागे टाकलं आहे. जन्नतच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ४९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर शाहरुख खानचे ४६.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. या गोष्टीत जन्नतने करिना आणि सारा अली खानलासुद्धा मागे टाकलय. साराचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ४५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर करिना कपूरचे १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा… पाच वर्षांचं अफेअर, लिव्ह इन अन्…; आता पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा करणार लग्न, ‘असा’ असेल सोहळा

रिपोर्ट्सनुसार जन्नतची नेटवर्थ २५ कोटी आहे अशी चर्चा आहे. जन्नत महिन्याला २५ लाखांपर्यंत कमावते. महितीनुसार, ‘खतरों के खिलाडी’मधली सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक जन्नत होती. एका एपिसोडसाठी जन्नत १८ लाख रुपये मानधन घेत होती.

‘सियासत डेली’च्या रिपोर्ट्सनुसार, इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी जन्नत १.५ ते २ कोटी मानधन घेते.

हेही वाचा… “माझ्या मुलांनी पळून जाऊन…” अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल ट्विंकल खन्नाने केलं भाष्य

दरम्यान, जन्नतने वयाच्या २१व्या वर्षी मुंबईत स्वकमाईने घर घेतलं. जन्नत इन्स्टाग्रामबरोबरच युट्यूबवरसुद्धा सक्रिय असते. तिची ओळख कन्टेन्ट क्रिएटर अशीही असल्याने ती निरनिराळे फोटोज आणि व्हिडीओज आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते.