अभिनेत्री जया बच्चन अभिनयासोबतच त्यांच्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा स्वभाव हा रागीट असल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. अनेक प्रसंगी जया बच्चन सार्वजनिक ठिकाणी रागावतानाही दिसल्या आहेत. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना फटकारताना त्या दिसल्या आहेत. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला. पण यावेळी नेटकऱ्यांनी त्यांच्या या वागण्याचा निषेध करत त्यांच्यावर टिका केली आहे.

आणखी वाचा : सुरुवातीला मिळालेले अपयश पचवून ‘या’ अभिनेत्याने आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी थेट गाठली उरी

हा व्हिडीओ ‘वुमप्ला’ने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईतील फॅशन वीक कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी जया बच्चन त्यांची नात नव्या नवेली नंदासोबत पोहोचल्या होत्या. परंतु कार्यक्रमाला उपस्थित मीडिया रिपोर्टर्सना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसला. मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो आणि शूटिंग करणं‌ सुरु केल्यावर त्यांनी मीडिया फोटिग्राफर्सना त्यांच्या प्रोफेशनबद्दल प्रश्न विचारला. जया बच्चन यांचा हा अंदाज नेटकऱ्यांना अजिबात रुचला नाही आणि नेटकऱ्यांनी यावर पुन्हा जया यांचा यांची खिल्ली उडवली.

या व्हिडिओमध्ये मीडिया रिपोर्टर्सनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केल्यानंतर जया बच्चन काही रिपोर्टर्सकडे बघून म्हणाल्या, “तुम्ही कोण आहात? तुम्ही मीडियाचे आहात का? तुम्ही कोणत्या मीडियातील आहात?” त्यानंतर त्या रिपोर्टर्सनी विरल भयानी आणि मानव मंगलानी यांची नावं घेतली आणि त्यांच्या टीमपैकी असल्याचे सांगितले. त्यांचे हे उत्तर ऐकून जया बच्चन चिडलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, “काय? कोण? हे कोणते वृत्तपत्र आहे?” यावर नव्या त्यांना जया यांना ईशारा करत ते कोण असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारानंतर जया बच्चन कार्यक्रमाला परत जाताना दिसल्या.

हेही वाचा : जया बच्चन यांना पुन्हा एकदा राग अनावर, चाहत्यांना म्हणाल्या, “तुम्हाला लाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर जया बच्चन यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. जया यांचा हा अंदाज पाहून अनेकांना राग आला. एकाने लिहिले, “अमिताभ बच्चन हे जेंटलमन आहेत आणि त्याविरुद्ध जया बच्चन. बिग बींकडून काहीतरी शिका” तर दुसऱ्याने लिहिले, “हा इतका अटीट्युड कसला आहे?” आणखीन एका नेटकऱ्याने लिहिले, “जया जी, त्यापेक्षा तुम्ही घरीच थांबा.” अजून एका नेटकऱ्याने लिहिले, “जया यांचा हा अंदाज पाहून त्यांच्या नातीलाही हसू आलं.”

दरम्यान जया बच्चन लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत