गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. आता येथील हिंसाचाराने क्रूरतेचा कळस गाठला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीतर संबंधित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- अभिनेत्रीला मुलाखतीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार

या घटनेवर अनेक स्तरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. मणिपूरमधील या घटनेचा व्हिडीओ बघून जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. जया बच्चन म्हणाल्या हा व्हिडीओ मी पूर्ण बघू शकले नाही. कारण व्हिडीओ बघताना मलाच लाज वाटत होती. ही घटना मे महिन्यात घडली होती आणि त्याचा व्हिडीओ आत्ता व्हायरल होत आहे. यूपीमध्ये तर प्रत्येक दिवशी काही ना काही घडत आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी बाहेर येत नाहीत. या संपूर्ण देशात काय चाललं आहे? महिलांचा एवढा अपमान होत आहे. हे सगळं बघून खूप दु:ख होत आहे.

हेही वाचा- “कधी निर्भया, कधी मुंबई, आणि आता मणिपूर…”, प्रसिद्ध गायकाने मणिपूर घटनेवर व्यक्त केला संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितलं की, या घटनेबाबत महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. यावेळी मी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.