बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या काही तासांतच करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘जवान’च्या ट्रेलरविषयी बॉलीवूडमधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ‘जवान’ प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई करेल असा दावा एका अभिनेत्याने केला आहे. सध्या त्याने केलेल्या ट्वीटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’मध्ये वंदना गुप्तेंनी नेसलेल्या साड्यांची ‘भारी’ गोष्ट, जाणून घ्या…

अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरके सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ट्विटरवर आपले मत व्यक्त करून केआरके सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अलीकडेच केआरकेने शाहरुख खानच्या ‘जवान’ संदर्भात मोठा दावा केला आहे. केआरके आपल्या ट्वीटमध्ये लिहितो, “जवानचा ट्रेलर मी पाहिला, हा चित्रपट १०० टक्के साऊथ स्टाईलमध्ये बनवण्यात आला असून यामध्ये प्रेक्षकांना ८० टक्के व्हिएफएक्सची झलक पाहायला मिळेल. या सगळ्यामुळे चित्रपटात शाहरुख ३० वर्षांच्या मुलाप्रमाणे दिसत आहे. तसेच दिग्दर्शक अ‍ॅटलीचा हा सिनेमा पहिल्याच दिवशी ५० कोटींची कमाई करणार…”

हेही वाचा : दीपिका पदुकोणबरोबर खास फोटो शेअर करून रणवीर सिंहने मानले चाहत्यांचे आभार, कारण…

केआरके पुढच्या ट्वीटमध्ये लिहितो, “जवान संपूर्ण जगभरात ३०० कोटींहून अधिक व्यवसाय करेल. खरंच जवानने हा विक्रम केला तर शाहरुख खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि जर चित्रपटाला ३०० कोटींचा गल्ला जमावण्यात यश आले नाही, तर शाहरुखने पठाण चित्रपटाला सुपरहिट केल्याबद्दल ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दल’ यांना १०० कोटी भेट म्हणून द्यावे.” पठाण चित्रपटादरम्यान दीपिकाच्या भगव्या बिकिनी वरून वाद झाला होता त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर केआरकेच्या या ट्वीटची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा : “तिच्यासाठी मुलं तासन् तास…”, अभिनेत्री विद्या बालनने सांगितला मलायका अरोराच्या कॉलेजच्या दिवसांमधील किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुन खानचा जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. त्याचबरोबर दीपिका पदुकोणचा यात खास कॅमिओ असणार आहे.