बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाने या पार्टीसाठी खास काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. या पार्टीतील कंगनाचा एक व्हिडीओ ‘फिल्मी कलाकार’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना हातात दारुचा ग्लास घेऊन सिद्धू मुसेवालाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कंगानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवाली परबचा व्हिडीओ चर्चेत

अनेकांनी कंगनाच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. “संस्कार, संस्कृती, हिंदूत्व याचा तरी विचार करायचा होता. प्रेक्षकांना जे सांगतेच ते विसरुन जातेस का?”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “बॉलिवूडमधील संस्कारी अभिनेत्री ही आहे असं वाटतं होतं”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “हिंदू धर्म व संस्कृतीचं पालन करत भजन-किर्तनात दंग एक स्त्री”, अशी कमेंटही एकाने केली आहे. अनेकांनी कंगनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला नशेडी व बेवडीही म्हटलं आहे.

हेही वाचा>> धीरेंद्र शास्त्री महाराजांचा ‘पठाण’ला होता विरोध; ‘बेशरम रंग’बाबतही केलेलं मोठं वक्तव्य, म्हणाले “हिरवा रंग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगना रणौतचा इमर्जन्सी चित्रपट भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.