अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी कंगनाला अनेकदा अडचणींचा समनाही करावा लागला आहे. बॉलीवूड असो वा राजकारण, कंगना आपला मुद्दा नेहमी बेधडकपणे मांडताना दिसते. बॉलीवूडमधील अनके कलाकारांच्या विरोधात कंगनाने उघडउघडपणे भाष्य केलं आहे. त्यामुळेच बॉलीवूडमध्ये कंगनाचे मित्र कमी आहेत. आता नुकतंच कंगनाने अभिनेता सलमान खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कॅमेऱ्याच्या मागे सलमान खानचं वर्तन नेमकं कसं असतं याबाबत कंगनाने खुलासा केला आहे.

हेही वाचा- “ती मला सारखं…”; प्रियांका चोप्राबरोबर झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने सांगितल कारण, म्हणाला…

कंगना ‘बिग बॉस सीझन ७’च्या एका एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. तिथेही तिने सलमानबरोबर खूप धमाल केली. खूप विनवणी केल्यानंतर कंगनाने ‘बिग बॉस’मध्ये येण्यास होकार दिला असल्याचं सलमान म्हणाला होता. मात्र कंगनाने हे खोटं असल्याचं सांगितलं होतं. कंगना म्हणाली, “मला सलमानला बिग बॉसच्या सेटवर भेटायचं होते. कारण सलमान सगळ्यांशी खूप नम्रतेने वागतो.”

‘सुलतान’ चित्रपटासाठी अनुष्का शर्मापूर्वी कंगनाला ऑफर देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हा चित्रपट न करण्याचं कारण सांगितलं होतं. “मी ज्या प्रकारचे सशक्त चित्रपट करत होते, त्यानंतर मला असा चित्रपट करायचा नव्हता की ज्यात फारसं काही करण्यासारखं नव्हतं. त्यामुळेच मी तो चित्रपट केला नाही. ‘सुलतान’मधील मुलीची व्यक्तिरेखा खूप चांगली होती, पण त्या भूमिकेत मला माझ्यासाठी काही खास दिसलं नाही.”

हेही वाचा- “जर चित्रपट प्रेक्षकांचं मन दुखावत असेल तर…”; ‘द केरला स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादावर नवाजुद्दिन सिद्दिकीचं वक्तव्य, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.