कायम वादग्रस्त वक्तव्य आणि बॉलिवूडविषयी राग व्यक्त करणारी कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतंच कंगनाने एका पोस्टच्या माध्यमातून तिच्या साडीबद्दल खुलासा केला आहे. कंगनाला साड्या खूप प्रिय आहेत. साडी नेसायची एकही संधी ती सहसा सोडत नाही. बहुतेक बऱ्याचशा कार्यक्रमात कंगना साडी नेसूनच येते. नुकतेच विमानतळावर तिला पाहण्यात आले. यावेळीही तिने साडी नेसली होती. तेव्हाचा एक व्हिडीओ तिने पोस्ट करत त्या साडीमागची एक गंमत सांगितली आहे.

याविषयी लिहिताना कंगना म्हणाली. “ही मी नेसलेली साडी कलकत्ता येथून केवळ ६०० रुपयांत घेतली आहे. फॅशन म्हणजे परदेशी उत्पादनांची गुलामी स्वीकारणे नव्हे. स्वतःच्या स्वदेसी उत्पादनाला आपणच प्रोत्साहन द्यायला हवं. तुम्ही जर स्वदेशी वस्तु घेतल्यात तर आपल्याच लोकांची पोटं भरणार आहेत. त्यामुळे लोकलसाठी व्होकल व्हायला हवं. जय हिंद.”

आणखी वाचा : करीना कपूर ते मलायका अरोरा, बॉलिवूडच्या BFF गँगचे फोटो पाहिलेत का?

तिच्या या पोस्टला लोकांनी पसंती दर्शवली पण काही लोकांनी कंगनाचा दुटप्पीपणा उघड करायचा प्रयत्न केला. ज्या व्हिडिओमधील साडीविषयी कंगनाने पोस्ट केली आहे त्या व्हिडिओमध्ये कंगनाच्या हातात जी लेडी देऑर या ब्रँडची बॅग आहे त्या बॅगेची किंमत ही भारतात ३.५ लाख इतकी आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देणाऱ्या कंगनाच्या या पोस्टमध्ये लोकांनी तीचंच पितळ उघडं पाडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kangana ranaut
kangana ranaut

नुकतंच कंगनाने हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.