बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ‘सिटाडेल’ वेब सीरिजचे प्रमोशन करताना प्रियांकाने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. यामध्ये तिने बॉलीवूड सोडण्याचे कारण काय होते?, चित्रपटसृष्टीत तिला मिळालेली वागणूक अशा बऱ्याच गोष्टींबाबत खुलासा केला होता. सध्या प्रियांकाचा आणखी एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, दिग्दर्शक करण जोहरला लग्नाला का नाही बोलावले याबाबत सांगत आहे.

हेही वाचा : रणबीर-दीपिकाच्या ‘ये जवानी है दीवानी’ला १० वर्षं पूर्ण; चाहते म्हणतात, “फक्त एक गिफ्ट द्या चित्रपट पुन्हा…”

प्रियांका चोप्राचे २०१८ मध्ये भारतात लग्न झाले. लग्नानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. हा कौटुंबिक सोहळा असल्याने मी कोणालाच बोलावले नाही असे या व्हिडीओमध्ये प्रियांका सांगत आहे. या वेळी प्रियांका म्हणाली, “आम्ही दोघांनी फक्त निक आणि माझ्या परिवाराला निमंत्रण दिले होते. आमच्या लग्नात आम्ही खूप मजा केली” यानंतर करण म्हणाला, “प्रियांका तू बॉलीवूडमधील कोणालाच तुझ्या लग्नाला बोलावले नव्हतेस…” यावर स्पष्ट उत्तर देत प्रियांका म्हणाली “हो! कारण मलाही बऱ्याच कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.” हे उत्तर दिल्यावर प्रियांका जोरजोरात हसू लागली असे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Fast X : हॉलीवूडच्या ‘फास्ट एक्स’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; अवघ्या १२ दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर प्रियांकाच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट करीत तिच्या खरेपणाचे कौतुक केले आहे. तसेच एका युजरने “तिला करणला बोलावण्याची तिची इच्छा नव्हती…” अशी कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच ‘जी ले जरा’चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रियांकाबरोबर कतरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसतील.