करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. करणला बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखलं जातं. तो अविवाहित असून सात वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. यश व रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. करणला त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. फेय डिसूझाच्या चॅट शोमध्ये संवाद साधताना निर्मात्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. वयाच्या चाळीशीत त्यालाही जोडीदाराची गरज भासत होती पण, पन्नाशी ओलांडल्यावर करणने जोडीदार शोधणं बंद केलं. यामागे अनेक कारणं असल्याचं करणने या मुलाखतीत सांगितलं.

करण जोहर सांगतो, “मी बऱ्याच वर्षांपासून सिंगल आहे. मी कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाहीये. खरं सांगायचं झालं, माझ्या संपूर्ण आयुष्यात आतापर्यंत मी दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. पण, आता मी सिंगल असल्याचा मला किती आनंद आहे हे मी तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आता भविष्यात मी पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये येईन असं मला अजिबात वाटत नाही. बाथरुम, बेडरुम, माझी पर्सनल स्पेस कोणाबरोबर तरी शेअर करणं या गोष्टी मी विसरून गेलोय. माझा दिवस माझी आई अन् मुलांपासून सुरू होतो आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात संपतो.”

हेही वाचा : अमेरिकेहून भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार? सेटवरील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

“मी ४० वर्षांचा झाल्यावर मला जाणवायचं आयुष्यात जोडीदार हवा…पण, जेव्हा मी पन्नाशी ओलांडली त्या दिवसांपासून मला माझ्या आयुष्यात आता आणखी कोणीही नको असं वाटू लागलं. डेट करणं, देशातील किंवा देशाबाहेरच्या लोकांना जाऊन भेटणं या सगळ्या परिस्थितीतून मी गेलो आहे. सगळं काही अनुभवलं आहे. पण, इथून पुढे मला खरंच कोणी योग्य वाटलं तर ठिके… नाहीतर सध्या मला जोडीदाराची गरज अजिबात वाटत नाही.” असं स्पष्ट मत करण जोहरने मांडलं.

हेही वाचा : Video : मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याशिवाय करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर करण जोहरने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं. यामध्ये आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय धर्मा प्रोडक्शनचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशल व तृप्ती डिमरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.