चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो. ‘कॉफी विथ करण’मध्ये करणच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव अनेक कलाकारांना आला आहे. परंतु अचानक आज त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक वेगळीच स्टोरी शेअर केली आहे.

करण जोहर म्हणजेच बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या लोकप्रिय ‘केजो’ने अचानक आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सौंदर्याची व्याख्या मांडत करणने अनेकांना खडेबोल सुनावले आहेत. आजकाल सौंदर्यासाठी जे लोकं फिलर्स, सर्जरी करतात त्यांच्याबद्दल केजोने भाष्य केलं आहे.

loksatta analysis about chatbot and its use created by artificial intelligence
विश्लेषण : चॅटबॉट चक्क भविष्य सांगणार? अमेरिकेत सुरू आहे अद्भुत संशोधन…
Apple WWDC 2024 iOS 18 Apple Intelligence Siri more smarter and personal and many more Worldwide Development Conference Live Updates
Apple WWDC 2024 Updates: सिरी होणार आणखीन हुश्शार अन् नवीन सॉफ्टवेअरसह तुम्ही ‘या’ गोष्टी करू शकणार कस्टमाईज्ड…
Sachin Tendulkar Tobacco Comment
सचिन तेंडुलकरची ‘तंबाखू’वर पोस्ट; सेहवाग व गावसकर यांना चार वाक्यात खरंच सुनावलं का? म्हणाला, “मी जसा जगलो आहे..”
artificial intelligence in libraries artificial intelligence role in libraries
कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – वास्तवदर्शी अनुभव
marathi actors aastad kale reaction on trolls
“आडनावावर, घरच्यांवर जाण्याची गरज नाही”, आस्ताद काळे ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलला; म्हणाला, “सभ्य भाषेत…”
expensive, books, children,
महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?
pushkar jog shares opinion on marathi film industry
“एकजूट नाही, लॉबिंग करतात”, पुष्कर जोगने मराठी इंडस्ट्रीबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “कोणाचीही साथ नाही…”
rohit raut and juilee joglekar reaction on live in relationship
“ट्रोल केलं, नातेवाईकांचे फोन आले”, रोहित-जुईली लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल स्पष्टच बोलले; म्हणाले, “नाक खुपसू नका…”

करण म्हणाला, “फिलर्स केल्याने तुम्हाला पूर्तता मिळणार नाही. मेकअपचा वापर केल्याने जे वय वाढणार आहे ते थांबणार नाही. कितीही बोटॉक्स केलं तरी मधमाशी चावल्यासारखेचं तुम्ही दिसाल. नाक बदलून घेतलं तरी गंध अत्तरासारखा येणार नाही. सर्जरीमुळे तुम्ही बाहेरून जरी बदलला असाल. तरी तुमच अंत:करण बदलू शकणार नाही.”

हेही वाचा… “एप्रिल फूल बडे मियाँ”, टायगर श्रॉफचा प्रॅंक पडला त्याच्यावरच भारी; अक्षय कुमारच्या तोंडावर कोल्ड ड्रिंक उडताच…

दरम्यान करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला. यात सिद्धार्थ मल्हेत्राने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच सारा अली खान अभिनीत ‘ए वतन मेरे वतन’ स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट २१ मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा… “आज काय बनवू?”, अक्षराने पती अधिपतीला प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तर आलिया भट्ट अभिनीत ‘जिगरा’ चित्रपटही लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.