scorecardresearch

Premium

‘कॉफी विथ करण सीझन ८’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पठाण’ आणि ‘पुष्पा’ लावणार हजेरी?

लवकरच करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे

koffee with karan season 8
कॉफी विथ करण आगामी सीझन (फोटो : सोशल मिडिया)

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. याबरोबरच तो त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय टॉक शोसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. करणच्या या टॉक शोवर वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि धमाल गप्पा आणि गॉसिप करतात. त्याचा हा शो प्रथम टेलिव्हिजनवरही यायचा, पण गेल्याच वर्षी आलेल्या सीझनपासून करणने हा शो फक्त ओटीटीवर येणार असल्याचं जाहीर केलं.

इतर सीझनप्रमाणेच ‘कॉफी विथ करण सीझन ७’सुद्धा गॉसिप्सनी भरलेला होता. विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, समांथा रूथ प्रभू, अक्षय कुमार, कतरिना कैफ, अशा कित्येक सेलिब्रिटीजनी या सीझनमध्ये हजेरी लावली. आता ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या सीझनची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार लवकरच ‘कॉफी विथ करण’चा सीझन ८ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
khara khara sang
‘खरं खरं सांग’ नाटकात मोठा बदल, ‘हे’ कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत, कारण..
nirmiti sawant and Siddharth Chandekar announced star pravah new serial
‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…

आणखी वाचा : Bholaa Movie leaked : अजय देवगणची चिंता वाढली; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘भोला’ झाला लीक

यावर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा टॉक शो पुन्हा येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर या सीझन ८ मध्ये मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. गेल्या सीझनमध्ये शाहरुख खानच्या गैरहजेरीमुळे बरेच चाहते नाराज झाले होते, पण या नव्या सीझनमध्ये शाहरुख दिसणार असून ‘पठाण’च्या घवघवीत यशाबद्दल तो बोलणार आहे.

‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार गेल्यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या दाक्षिणात्य कलाकारांनाही करण जोहर या कार्यक्रमात बोलवणार आहे. केजीएफ स्टार यश. अल्लू अर्जुन आणि रिषभ शेट्टी हेसुद्धा या टॉक शोचा हिस्सा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप करणने याबाबतीत कोणतंही वक्तव्य किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. २८ जुलैला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karan johar planning for new season of coffee with karan with shahrukh khan and allu arjun avn

First published on: 30-03-2023 at 17:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×