scorecardresearch

आता मी येतच नाय! लेक तैमूरच्या पाठीमागे धावणाऱ्या करीना कपूरचा व्हिडीओ व्हायरल

तैमूर धावत गेटबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण करीना त्याच्यामागे…

आता मी येतच नाय! लेक तैमूरच्या पाठीमागे धावणाऱ्या करीना कपूरचा व्हिडीओ व्हायरल
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिचा मुलगा जेह आणि तैमुरमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. आज करीना पुन्हा एकदा मोठा मुलगा तैमूर अली खानबरोबर स्पॉट झाली. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ती तैमूरच्या मागे गेटकडे धावताना दिसत आहे. तैमूर धावत गेटबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण करीना त्याच्यामागे धावत त्याला परत येण्यास सांगते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, करीना गेटच्या दिशेने धावताना दिसत आहे. तैमूर पुढे पळतोय आणि करीना त्याच्या मागे धावत आहे. आधी गेट बंद झाल्यावर तैमूर घाईघाईने पुढच्या गेटकडे धावत जातो, नंतर आई करीना मागे धावत आल्याने तो थांबला आणि करीनासह बिल्डिंगमध्ये परत गेला. यावेळी सैफ अली खान देखील त्याच ठिकाणी होता. तैमूर करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, तैमूर त्याची मामे बहीण आणि रणबीर कपूर-आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूरला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. ६ डिसेंबर रोजी राहा एक महिन्याची होईल तेव्हा कुटुंबातील जवळचे लोक भेटणार असल्याचं कळतंय. तेव्हाच तैमूरची भेट राहाशी होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या